लाच प्रकरणातील आरोपी महिला अधिकाऱ्यास सत्र न्यायालय, पुसदकडून जामीन मंजूर

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव येथील बालविकास प्रकल्प कार्यालयातील प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अंगणवाडी मदतनीस पदासाठी निवडीच्या बदल्यात लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या प्रकरणात २७ जुलै २०२६ रोजी सत्र न्यायालय, पुसद यांनी आरोपी महिला अधिकारी शकुंतला जयवंत इंगोले (वय ५७) यांना जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. विनायक बोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला.
तसेच या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते संजय नागरगोजे व विश्वनाथ महामुने यांनी संबंधित कागदपत्रे, साक्षी व आवश्यक पुरावे बचाव पक्षाच्या वकिलांना उपलब्ध करून दिल्याने बचाव पक्षाला महत्त्वाचे सहकार्य मिळाल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, एसीबीने दाखल केलेल्या लाच प्रकरणात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपी महिला अधिकाऱ्यास जामीन मंजूर करून दिलासा दिला.



