अ, ब, क, ड उपवर्गीकरणाला विरोध; महागावात आंबेडकर अनुयायांची बैठक

महागाव प्रतिनिधीसंजय नागरगोजे
महागाव, दि. २५ जुलै : अनुसूचित जातींच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या विरोधात समाजजागृती व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शनिवारी आंबेडकर अनुयायांची बैठक पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी परसराम कांबळे होते, तर हरिभाऊ मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. शरदचंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली उपवर्गीकरणाच्या विषयावर चर्चा झाली. समाजाने संविधानिक मार्गाने एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पुढील आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी डॉ. नरेंद्र भवरे, दलितानंद खडसे, डॉ. अशोक राऊत, प्रल्हाद नवसागरे, विजयकुमार कांबळे, विजय लहाने, विजय मनसरे, रामराव कांबळे, विलास पाईकराव, प्रविण कावळे, धम्मानंद कावळे, किशोर राऊत, रविराज कावळे, अशोक विऱ्हाडे, संतोष कांबळे, पंजाब सरदार, अभिलाष भगत, गौतम कदम, विनोद भगत, रमेश सांगडे, रवी बनसोड, पंडित कांबळे यांच्यासह तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित कार्यकर्त्यांनी उपवर्गीकरणाला एकमुखी विरोध दर्शवत समाजाने एकसंघ राहून संविधानिक मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.



