शहर

शिवसेनेत महागाव नगरपंचायत उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे यांचा अधिकृत प्रवेश


महागाव | प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीचे उपाध्यक्ष प्रमोद रामराव भरवाडे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर श्रद्धा व्यक्त करत तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत अधिकृतपणे शिवसेना पक्षात प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे तसेच विदर्भ सहसंपर्कप्रमुख पराग पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पक्षप्रवेशानंतर प्रमोद भरवाडे यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार मानले. शिवसेनेने आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत जनतेची निस्वार्थ सेवा, विकासाची बांधिलकी आणि पक्षाची विचारधारा अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महागाव तालुक्यातील राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली असून, भरवाडे यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button