शहर

नगराध्यक्ष शेख रफिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार पल्लवी मॅडम टेमकर यांच्या उपस्थितीत हिमायतनगर येथील मतदार नोंदणी कॅम्प यशस्वी; २,००० हून अधिक अर्ज दाखल, तहसीलदारांचा सत्कार!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): येथील नगरपंचायतीच्या वतीने चौपाटी दारुल उलूम समोर विशेष ‘SIR’ मतदार नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. हिमायतनगरचे नगराध्यक्ष शेख रफिक सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कॅम्प राबवण्यात आला. या मोहिमेच्या यशस्वी नियोजनाबद्दल नगराध्यक्ष शेख रफिक सेठ यांच्या हस्ते तहसीलदार पल्लवी मॅडम टेमकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
​या मतदार नोंदणी कॅम्पला हिमायतनगरच्या नागरिकांनी ऐतिहासिक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नगराध्यक्ष शेख रफिक सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार मॅडमच्या उपस्थितीत आज दिवसभरात तब्बल २ हजार हून अधिक (२,०००+) नवमतदारांचे अर्ज (फॉर्म) भरून घेण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे.
​या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी माईकवरून आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार सैयद मन्नान आणि हनीफ सर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन करत मतदार नोंदणीचे महत्त्व पटवून दिले.
​हा ऐतिहासिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बी.एल.ओ. (BLO) आणि नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वांकडून कौतुक होत आहे.
​तसेच शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेवक प्रतिनिधी, स्थानिक पत्रकार बंधू आणि नागरिकांनी प्रशासनाला मोलाचे सहकार्य (को-ऑपरेट) केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा कॅम्प अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button