शहर

नगराध्यक्ष शेख रफिक, तहसीलदार पल्लवी मॅडम आणि नगरपंचायतीच्या वतीने उद्या चौपाटी दारुल उलूम समोर ‘SIR’ मतदार नोंदणी कॅम्प; हिमायतनगरकरांना सुवर्णसंधी!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): शहरातील चौपाटी दारुल उलूम समोर उद्या सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नगरपंचायतीच्या वतीने ‘विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)’ मतदार नोंदणी आणि दुरुस्तीच्या विशेष फॉर्म भरण्याच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष जनाब शेख रफिक सेठ यांनी या कॅम्पची अधिकृत माहिती दिली असून नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
​या कॅम्पमध्ये शहरातील सर्व बी.एल.ओ. (BLO), नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी दिवसभर उपस्थित राहून नागरिकांना नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे किंवा दुरुस्तीचे आवश्यक फॉर्म भरून घेण्यास मदत करणार आहेत.
​विशेष म्हणजे, नागरिकांच्या सुविधेसाठी आणि या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार पल्लवी मॅडम स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी हिमायतनगर शहरातील सर्व पात्र व इच्छुक नागरिकांनी या विशेष कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष शेख रफिक सेठ, सर्व नगरसेवक आणि नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button