शहर

अ. अजीम हिंदुस्तानी सामाजिक समितीच्या वतीने मा. अध्यक्ष / मुख्याधिकारी, नगर पंचायत कार्यालय हिमायतनगर यांना नवीन नळ जोडणी मध्ये गोरगरीब लोकांसाठी रक्कम कमी करून नाममात्र सवलत देणे बाबत निवेदन


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): शहरातील गोरगरीब जनतेला नवीन नळ जोडणी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे व्हावे, यासाठी .अ. अजीम हिंदुस्तानी सामाजिक समितीच्या वतीने नगर पंचायतीचे मा. अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे नळ जोडणी शुल्कात सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
​सध्या नगर पंचायत अंतर्गत नवीन नळ जोडणीसाठी एकूण ४००० रुपये नगर पंचायतकडून घेतले जातात. ही रक्कम अतिशय जास्त असून, शहरातील गोरगरीब लोकांना व मजुरांना ती भरणे परवडणारे नाही. वाढीव शुल्कामुळे सर्वसामान्य नागरिक नवीन नळ जोडणी घेण्यास नकार देत आहेत.
​या पार्श्वभूमीवर, नगर पंचायतने प्रशासकीय काळात घेतलेल्या ठरावावर पुनर्विचार करावा. नवीन नळ जोडणीसाठी कनेक्शन डिपॉझिटची रक्कम १५०० रुपये व रस्ता खोदकामासाठी १००० रुपये, अशी एकूण २५०० रुपयांची व्यवस्था करून गोरगरीब लोकांना दिलासा द्यावा, अशी नम्र विनंती समितीने केली आहे. हे निवेदन १५ जुलै २०२६ रोजी नगर पंचायत कार्यालयात रितसर सादर करण्यात आले असून, प्रशासनाच्या निर्णयाकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button