शहर

मुला मुला नहीं, झुलते जाओ…” हिमायतनगरमध्ये चिमुकल्यांनी जिवंत केली पूर्वजांची परंपरा; पाऊस पडत नसल्याने वॉर्ड क्र. ५ मध्ये काढला ‘बेडकोली मोर्चा’


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
आकाशातून पावसाचा थेंबही पडत नसल्याने आणि दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असल्यामुळे हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये आज जुन्या परंपरेची आठवण करून देणारे एक भावुक दृश्य पाहायला मिळाले. पूर्वजांच्या काळातील परंपरेचे जतन करत लहान मुलांनी एका लाकडाला कडुनिंबाच्या फांद्या गुंडाळल्या आणि त्यालाच बेडकोली (बेडूक) बांधून हा अनोखा ‘मुला मुला’ मोर्चा काढला.
​हातात कडुनिंबाच्या पाल्यामध्ये बेडकोली बांधलेली ही काठी धरून वॉर्डातील प्रत्येक घराच्या दारात भटकत ही निष्पाप मुले “मुला मुला नहीं, झुलते जाओ, नदी का पानी गिरते जाओ…” अशा घोषणा देत होती. चिमुकल्यांची ही पाण्यासाठीची धडपड पाहून नागरिक भावुक झाले. या मोर्चामध्ये मुलांसोबत शेख सलीम आणि बाबू भाई हे देखील आवर्जून सामील झाले होते. त्यांनी मुलांचा उत्साह वाढवत, परंपरेनुसार त्यांच्यावर पाणी शिंपडून या आंदोलनाला पाठिंबा दिला.
​मोठ्यांची प्रार्थना जेव्हा अपयशी ठरली, तेव्हा या चिमुकल्यांनी पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून निसर्गाच्या दरबारात साकडं घातलं आहे. खुदा या निष्पाप मुलांची हाक नक्कीच ऐकेल आणि हिमायतनगरवर लवकरच आपल्या रहमतीचा (कृपेचा) पाऊस पाडेल, अशीच प्रार्थना आता प्रत्येक जण करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button