शहर

तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांचा वार्ड क्रमांक ८ मध्ये धडाकेबाज दौरा; नगरसेवक जिशान मिर्झा यांच्या कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): येथील वार्ड क्रमांक ८ मध्ये मतदार यादी शुद्धीकरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक विशेष सखोल पुनरीक्षण (S.I.R.) प्रक्रिये संदर्भात नागरिकांमध्ये मोठी जनजागृती करण्यासाठी मा. तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांनी विशेष सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यादरम्यान तहसीलदार मॅडम यांनी थेट वार्ड क्रमांक ८ चे धडाडीचे नगरसेवक जिशान मिर्झा यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन तेथे उपस्थित नागरिकांशी प्रत्यक्ष आणि सकारात्मक संवाद साधला.
​”लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आणि ते अचूक असणे ही आपली कायदेशीर व नागरी जबाबदारी आहे. या प्रक्रियेपासून एकही नागरिक वंचित राहू नये,” असे प्रतिपादन तहसीलदार मॅडम यांनी यावेळी केले. या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी S.I.R. मोहिमे संदर्भातील आपल्या विविध शंका, अडचणी व तांत्रिक प्रश्नांचे प्रशासनाकडून जागेवरच अत्यंत समाधानकारक निरसन करून घेतले. या धडाकेबाज दौऱ्यामुळे वार्ड क्रमांक ८ मधील नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button