शहर

महागावचा प्रतिनिधीच जिल्हा बँकेवर जावा; २७ प्रतिनिधींच्या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष (भाग २)


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महागाव तालुक्यातील २८ सहकारी संस्थांनी ठरावाद्वारे आपले प्रतिनिधी निश्चित केले असून, आता या २८ प्रतिनिधींपैकी जिल्हा बँकेवर कोणाला पाठविले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
माहितीनुसार, निवडलेल्या प्रतिनिधींमध्ये विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच सहकार क्षेत्रात कार्यरत पदाधिकारी यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राचा अनुभव, नेतृत्व क्षमता आणि तालुक्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्तीचीच निवड व्हावी, अशी अपेक्षा अनेक प्रतिनिधी व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, मुडाणा सोसायटीमधून उमरखेड येथील एका व्यक्तीचे नाव चर्चेत असून, स्थानिक प्रतिनिधींऐवजी बाहेरील व्यक्तीला संधी द्यावी का, यावरही राजकीय व सहकारी वर्तुळात चर्चा सुरू आहे. महागाव तालुक्यातील अनुभवी प्रतिनिधी उपलब्ध असताना स्थानिक नेतृत्वालाच प्राधान्य मिळावे, अशी भूमिका काही प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
महागाव तालुक्यातील सर्व २७ प्रतिनिधींनी एकत्रित बसून तालुक्याच्या हिताला प्राधान्य देणारा, सहकार क्षेत्राचा अनुभव असलेला आणि जिल्हा बँकेत प्रभावीपणे तालुक्याचे प्रतिनिधित्व करू शकणारा उमेदवार निवडावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवडणुकीत केवळ एका व्यक्तीची निवड होणार नसून महागाव तालुक्याच्या सहकार क्षेत्राची प्रतिष्ठाही पणाला लागली असल्याचे मत काही प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अंतिम निर्णय काय होतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.
क्रमशः… पुढील भागात आणखी महत्त्वाचे राजकीय आणि सहकारी घडामोडींसह सविस्तर विश्लेषण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button