सिंघम’ पी.आय. लक्ष्मण केंद्रे यांची ‘ॲक्शन टीम’; नगर पंचायतीच्या सुस्त कारभाराला पोलिसांचा झटका!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम )
: दिनांक २४ जून २०२६, वार बुधवार रोजी हिमायतनगर शहरात पोलीस प्रशासनाने सिंघम स्टाईल धडक कारवाई केली आहे. माननीय पोलीस निरीक्षक (PI) लक्ष्मण केंद्रे साहेब यांच्या आदेशानुसार बाजारपेठेतील बेशिस्त वाहतूक, अवैध धंदे आणि अतिक्रमणावर कडक बडगा उभारण्यात आला.
नगर पंचायत केवळ टॅक्स वसुलीत मग्न; जनतेचा संताप:
वास्तविक पाहता, बाजारपेठेतील अतिक्रमण हटवणे आणि दुकानदार व हातगाड्यांना नियमानुसार शिस्त लावणे हे नगर पंचायतीचे काम आहे. मात्र, नगर पंचायत केवळ कर (टॅक्स) गोळा करण्यात धन्यता मानत असून नियमांची अंमलबजावणी करण्यास पूर्णपणे अपयशी ठरली आहे. नगर पंचायतीचे कर्मचारी आजपर्यंत कधीही बाजारपेठेत फिरकलेच नाहीत, असा संतप्त आरोप करत “अधिकारी केवळ कार्यालयात बसून पगार लाटत आहेत का?” असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे. नगर पंचायतीच्या याच सुस्त कारभारामुळे बाजारपेठेत रस्ता दाबून दुकाने लावली गेली होती.
…अन् ‘खाकी’ची ताकद काय असते, हे केंद्रे साहेबांच्या कार्यकाळात दिसले!
पोलीस म्हणजे काय? हे आज हिमायतनगरच्या जनतेला पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे साहेब यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष पाहायला मिळाले. त्यांच्या आदेशावरून मैदानात उतरलेल्या ‘ॲक्शन टीम’ने बाजारपेठेचा चेहराच बदलून टाकला:
१) नवाब खान पठाण (हजेरी मेजर): ऑन-ग्राउंड कमांड सांभाळत संपूर्ण टीमचे चोख नियोजन केले.
२) शेळके साहेब व ६ होमगार्ड जवान: रस्ता दाबून बसलेल्या दुकानदारांना हटवून बाजारपेठ चकाचक केली; आता कितीही मोठे वाहन अगदी सहजपणे तिथून निघून जात आहे.
३) सदावर्ते साहेब (PC): रस्त्यावरील बेशिस्त आणि विनापरवाना ९ वाहनांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करत एकूण ₹४,५५० चा दंड वसूल केला.
अवैध धंदे आणि भाईगिरीला चाप:
या मोहिमेत केवळ रस्ताच मोकळा झाला नाही, तर शहरातील अवैध धंदे आणि हुल्लडबाजांना पोलिसांनी थेट झटका दिला आहे. पोलिसांची ही विशेष पेट्रोलिंग दररोज संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नगर पंचायतीने हात झटकले तरी पोलिसांनी चोख कामगिरी बजावून महिला व नागरिकांना सुरक्षित वातावरण दिल्याबद्दल शहरात पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.



