पैगंबर मोहम्मद साहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा; हिमायतनगर पोलीस निरीक्षकांना मुस्लिम समाजाचे निवेदन

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पैगंबर हजरत मोहम्मद साहेब आणि उम्मुल मोमिनीन हजरत आयशा सिद्दीका यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, अपमानकारक आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य प्रसारित केल्याप्रकरणी हिमायतनगर येथील मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवार, २३ जून २०२६ रोजी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना मुस्लिम बांधवांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवर दिव्या सिंह (Divya Singh) नावाच्या अकाउंटवरून (@divyasingh4043) एक पॉडकास्ट/रील व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पश्चिम बंगाल (कोलकाता) येथील रहिवासी असलेल्या (नाझिया इलाही खान ) नावाच्या महिलेने पैगंबर मोहम्मद साहेब आणि हजरत आयशा सिद्दीका यांच्याबद्दल अत्यंत अमर्यादित आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत.
धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणताही धर्म असो, भारतीय कायदा आणि कोणतीही संस्कृती कोणालाही दुसऱ्याच्या धर्माबद्दल वाईट बोलण्याची किंवा धार्मिक भावना दुखावण्याची परवानगी देत नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात द्वेष पसरतो आणि शांतता धोक्यात येते. त्यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखण्यासाठी व सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी दोषींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) अंतर्गत तातडीने गुन्हा (FIR) नोंदवून कडक कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे.
पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर
हे निवेदन हिमायतनगर जामा मस्जिदचे सदर मुजीब खान, नगरसेवक जिशान मिर्झा, अनवर खान,बाखी भाई ् वाजिद खुरेशी् सालीम शेवालकर . जावेद खतीब, मूसा भाई, वाजिद कुरेशी, अफरोज खुरेशी .आणि नयुम मिस्त्री रहिम खुरेशी यांच्यासह मुस्लिम समाजातील सर्व स्तरांतील नागरिक, मान्यवर व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना हे निवेदन सुपूर्द केल्यानंतर, त्यांनी या प्रकरणी कायद्यानुसार योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी हा निषेध पूर्णपणे शांतताप्रिय आणि घटनात्मक मार्गाने नोंदवला आहे.



