शहर

महागाव बायपासजवळ कार अपघात; सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेसह पाच जण गंभीर जखमी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव बायपासवरील भिसे पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगातील एर्टिगा कार (क्रमांक MH 13 ES 7750) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील प्रवासी वाहनाबाहेर फेकले गेल्याने पाच जण गंभीर जखमी झाले.
जखमींमध्ये सुदर्शन ढाकू राठोड, सावन शिवराज पवार, अजित शिवा पवार, आदित्य गोविंद जाधव व सौ. सुप्रिया सावन पवार (सर्व रा. प्रतापनगर तांडा, सोलापूर) यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान हा अपघात निदर्शनास आला. प्रभारी ठाणेदार अंबुरे व इतर कर्मचारीघटनास्थळी इतर कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने जखमींना तातडीने शासकीय वाहन तसेच खाजगी वाहनांच्या मदतीने पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जखमींपैकी सौ. सुप्रिया सावन पवार या सहा महिन्यांच्या गर्भवती असून त्यांच्यावर डॉक्टरांकडून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या अपघाताची पुढील चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button