न्यायासाठी शेतकऱ्याची हाक; पशू खरेदीचा दाखला असूनही पोलिसांकडून बैल जप्त!

हिमायतनगर तालुका ( प्रतिनिधी : शेख खय्यूम)
शेती कामासाठी कायदेशीररित्या खरेदी केलेला बैल पोलिसांनी कत्तलीच्या संशयावरून जप्त केल्याचा गंभीर आरोप हिमायतनगर येथील अल्पभूधारक शेतकरी शेख जुबेर शेख रज्जाक यांनी केला आहे. या अन्यायकारक कारवाईविरोधात त्यांनी जिल्हा पोलीस उपअधीक्षक (भोकर) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
महत्वाचे मुद्दे:
कायदेशीर खरेदी: शेख जुबेर यांनी ६ जून २०२६ रोजी वडगाव (ज.) येथील आकाश राठोड यांच्याकडून १४,००० रुपयांना बैल खरेदी केला होता. त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा अधिकृत ‘पशू विक्री दाखला’ (क्र. ७८) उपलब्ध आहे.
पोलिसांची कारवाई: ७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता बैल घेऊन घरी परतत असताना, नायरा पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी संशयावरून त्यांना बैलासह ताब्यात घेतले.
मारहाण आणि धमकी: पोलीस ठाण्यात गैरवर्तन, मारहाण आणि वाच्यता केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप शेतकऱ्याने अर्जात केला आहे.

शेतकऱ्याची व्यथा
सध्या ऐन पेरणीचे दिवस असताना हक्काचा बैल गोशाळेत डांबल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे.
”आजचा शेतकरी फक्त स्वतःचे हक्क आणि इंसाफ मांगता है! माझ्याकडे खरेदीचे पक्के पुरावे असतानाही पोलिसांनी अन्याय केला. माझी शेतीची कामे ठप्प झाली आहेत.” — शेख जुबेर
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि जप्त केलेला बैल तात्काळ परत मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. या तक्रारीची प्रत १२ जून २०२६ रोजी वरिष्ठ पोलीस कार्यालयात अधिकृतपणे दाखल झाली आहे.



