शहर

हिमायतनगर शहरात १ जून रोजी धडक अतिक्रमण हटाव मोहीम; नगरपंचायतीकडून चोख पोलीस बंदोबस्ताची मागणी


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम ):
नांदेड जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या धर्तीवर आगामी १ जून रोजी हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शहरात तीव्र आणि धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. नगर पंचायत केवळ आपल्याच मालकीच्या जागेवरील अतिक्रमणे हटवणार असून, या धडक कारवाईसाठी तब्बल ४ जेसीबी तैनात करण्यात आले आहेत.
​सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने पोलीस प्रशासनाकडे चोख पोलीस बंदोबस्त पुरवण्याची रीतसर मागणी केली आहे.
​स्वतःचे नुकसान टाळण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन
या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, ज्या नागरिकांनी किंवा व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला, नगरपंचायतीच्या जागेवर आपली हाथगाडी, टिन शेड, ओटे किंवा इतर कोणतेही लहान-मोठे तात्पुरते अथवा कायमस्वरूपी अतिक्रमण केले असेल, त्यांनी ते १ जूनपूर्वी स्वतःहून सुरक्षित ठिकाणी हलवावे.
​प्रशासकीय पथकाद्वारे आणि ४ जेसीबीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या थेट कारवाई दरम्यान जर कोणाच्या साहित्याचे किंवा दुकानाचे नुकसान झाले, तर त्याला नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button