Uncategorized
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काळी दौलत येथे पोलीसांचे पतसंचलन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पतसंचलन करण्यात आले. परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
संवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या काळी दौलत येथे नागरिकांनी बकरी ईद शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करावी, यासाठी पोलिसांनी गावातील प्रमुख मार्गांवरून पतसंचलन केले. यावेळी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
गावातील नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच कोणत्याही अफवा किंवा गैरप्रकारांना आळा बसावा, या उद्देशाने हे पतसंचलन करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.



