संघर्षातून स्वप्नांकडे… प्रथमेश पाटीलची महिंद्रा युनिव्हर्सिटी, हैदराबाद येथे निवड

एजुफेलो हबच्या मार्गदर्शनातून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याची मोठी झेप
यवतमाळ : “मोठी स्वप्नं पाहायची असतील तर परिस्थिती नाही, तर जिद्द मोठी असावी लागते,” याची प्रचिती देणारी घटना म्हणजे प्रथमेश पाटील याची हैदराबाद येथील प्रतिष्ठित महिंद्रा युनिव्हर्सिटी मध्ये एम.ए. एज्युकेशन या अभ्यासक्रमासाठी झालेली निवड होय.
अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या प्रथमेशसाठी हा प्रवास सोपा नव्हता. पुढे काय करायचं, कोणत्या दिशेने जायचं, कोणत्या संधी आपल्यासाठी योग्य आहेत — या अनेक प्रश्नांमध्ये तो अनेकदा गोंधळलेला असायचा. मात्र काहीतरी मोठं करायचं, स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य बदलायचं ही त्याची जिद्द कायम होती.
फेब्रुवारी महिन्यात प्रथमेश(एजुफेलो हब Edufellow Hub) सोबत जोडला गेला. त्यानंतर त्याला सातत्याने मार्गदर्शन, मेंटरिंग, Higher Education संदर्भातील माहिती, Application Support तसेच योग्य शैक्षणिक संधींबाबत मदत करण्यात आली. स्वतःवर विश्वास ठेवत त्याने मेहनत सुरू ठेवली आणि आज मे महिन्यात त्याची निवड थेट हैदराबादमधील मोठ्या विद्यापीठात झाली आहे.
जळगावसारख्या सामान्य पार्श्वभूमीतून निघालेला हा विद्यार्थी आज मोठ्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करत आहे, ही बाब केवळ त्याच्यासाठीच नाही तर अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
(Edufellow Hub) चा मुख्य उद्देश हाच आहे की, ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, करिअर संधी, Fellowship, Quality Education आणि Mentoring उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून कोणताही विद्यार्थी माहितीअभावी मागे राहू नये.
प्रथमेश पाटील याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्याच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच�



