किनवट नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हसन लाला यांचे जोरदार स्वागत; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सदिच्छा भेट

किनवट तालुक (प्रतिनिधी शेख खय्यूम ): किनवट नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष (उपाध्यक्ष) पदाची धुरा हाती घेतल्यानंतर हसन लाला यांचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून जंगी स्वागत होत आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत केबिनमध्ये जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढे भरवून त्यांचे तोंड गोड केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष शेख रशीद, कासिमकुरेशी, अब्दुल जान लाला, अजीज भाई आणि अझर अली भाई या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून हसन लाला यांना भावी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
भेटी दरम्यान पदाधिकाऱ्यांनी किनवट शहराच्या विविध नागरी समस्यांवर आणि आगामी विकासकामांच्या आराखड्यावर सकारात्मक चर्चा केली. हसन लाला यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि अनुभवामुळे शहरातील रस्ते, पाणी, आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. उपनगराध्यक्ष हसन लाला यांनीही सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, पक्षाचा विश्वास सार्थ ठरवून शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या प्रसंगामुळे नगरपरिषद परिसरात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.



