शहर

हिमायतनगर: ‘पंतप्रधान होणं सोपं, पण मध्यम वर्गीव जीवन जगणं कठीण’; इंधन टंचाई आणि महागाईने जनता संतप्त

​
​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी: शेख खय्यूम):
​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या आवाहनानंतर हिमायतनगर शहरात सर्वसामान्यांच्या अडचणींत मोठी भर पडली असून, जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “डिझेलचा वापर कमी करा आणि सोन्याची खरेदी टाळा,” या संदेशामुळे जनजीवनावर गंभीर परिणाम होत आहेत.
​१. ‘राजा’ असावा तर असा: जनतेचा ऐतिहासिक सवाल
हिमायतनगरच्या संतप्त जनतेने यावेळी इतिहासाची आठवण करून दिली. “पूर्वीचे राजा-महाराजे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपली ओळख लपवून सामान्य जनतेत मिसळायचे, लोकांचे दुःख जाणून घ्यायचे आणि त्यानंतरच कायदा करायचे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. आजच्या काळात मात्र जनतेच्या वास्तवाचा विचार न करता थेट आदेश लादले जात आहेत, अशी खंत नागरिकांच्या वतीने व्यक्त होत आहे.
​२. लग्नसराईत सोन्याचा पेच आणि बापाच्या वेदना
सध्या लग्नसराईचे दिवस असून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. “ज्या बापाच्या घरात मुलीचं लग्न आहे, फक्त त्यालाच माहिती असतं की सोन्याशिवाय कन्यादान कसं होणार,” अशा शब्दांत एका बापाने आपले दुःख व्यक्त केले. “पंतप्रधान होणं सोपं असेल, पण एका मुलीचा बाप बनून आयुष्य काढणं खूप कठीण आहे,” अशी परखड टीका करत, पंतप्रधानांना स्वतःचा परिवार नसल्यामुळे त्यांना सामान्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव नाही, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
​३. शेतीची कामे आणि विस्कळीत वाहतूक
पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होत असून शेतीच्या मशागतीसाठी, नांगरणीसाठी ट्रॅक्टरला डिझेलची नितांत गरज आहे. मात्र, शहरात डिझेलचा मोठा तुटवडा असून ते १५० रुपयांपर्यंत चढ्या दराने विकले जात आहे. डिझेल अभावी वाहने बंद असल्याने चालकांचे उत्पन्न बुडाले असून, शेतीची कामे रखडल्यास देश कसा चालणार, असा उद्विग्न सवाल शेतकरी विचारत आहेत.
​४. प्रशासनासमोर मोठे आव्हान
शासकीय निर्बंध आणि इंधन टंचाईमुळे हिमायतनगरचा सामान्य नागरिक पूर्णपणे हवालदिल झाला आहे. ना शेतीसाठी डिझेल मिळतेय, ना घरात सोनं आणता येतंय; अशा परिस्थितीत सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button