हिमायतनगर नगरपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; विकासाचा निर्धार व्यक्त

हिमायतनगर तालुका (प्रतिनिधि शेख खयुम )
हिमायतनगर: १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून स्थानिक नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. सकाळी ठीक ठरलेल्या वेळी राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, सर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षांनी यावेळी उपस्थित नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. या सोहळ्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाणारे पत्रकार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी शहराच्या प्रगतीसाठी आणि जनहिताच्या कामांसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी बोलून दाखवला. या कार्यक्रमामुळे शहरात एकतेचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.



