शहर

भ्रष्टाचाराचा ‘घंटा’ दडला कचऱ्याच्या घंटा गाड्यात !नगर पंचायत अधिकारी करत आहेत माहिती देण्यास टाळटाल

हिमायतनगरमध्ये १४ पैकी १३ गाड्या भंगारात; माहिती दडवणाऱ्या प्रशासनाचा होणार भांडाफोड
​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
एकीकडे भारत सरकार ‘स्वच्छ भारत’ आणि ‘पारदर्शकतेचा’ डांगोरा पिटत असताना, हिमायतनगर नगरपंचायतीत मात्र संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. शहरासाठी असलेल्या १४ घंटागाड्यांपैकी तब्बल १३ गाड्या भंगारात काढून प्रशासनाने जनतेची क्रूर थट्टा चालवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या उभ्या असलेल्या गाड्यांवर आता चक्क भाजीपाला आणि वेली उगवल्या असून, हा भ्रष्टाचाराचा जिवंत पुरावा बनला आहे.
​बातमीचे कडक मुद्दे:
​संविधानाची पायमल्ली: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या माहितीच्या अधिकाराचा वापर करून ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी विचारलेल्या प्रश्नांना प्रशासनाने अद्याप उत्तर दिलेले नाही. ७ दिवसांचा अल्टिमेटम संपूनही माहिती लपवणे हे कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचे लक्षण आहे.
​सरकारी निधीचे ‘कुपोषण’: आरटीओ नियमानुसार वाहनांची मुदत १५ वर्षे असते, मग अवघ्या २-३ वर्षांत या गाड्या निकामी कशा झाल्या? गाड्यांच्या दुरुस्तीचा पैसा नेमका कोणाच्या घिशात गेला? गाड्यांवर उगवलेली ‘तरकारी’ प्रशासकीय निष्काळजीपणाचा बुरखा फाडत आहे.
​आता लढा थेट वरिष्ठांशी: स्थानिक कर्मचारी आणि अधिकारी माहिती दडवून कोणत्या राजकीय नेत्याला किंवा कंत्राटदाराला वाचवत आहेत? असा सवाल उपस्थित करत, आता या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) करण्यात येणार आहे.
​”लोकसेवक हे जनतेचे सेवक आहेत, मालक नव्हे. या घंटागाडी घोटाळ्याचे ‘स्पेशल ऑडिट’ करून दोषींना तुरुंगात पाठवल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा आक्रमक पवित्रा सजग नागरिकांनी घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button