Uncategorized

हिवरा (संगम) जवळ पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, बहिण गंभीर जखमी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील मुस्लिम कब्रस्तानाजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहिण गंभीर जखमी झाली.
मृत युवकाचे नाव बुद्धभूषण राजू भालेराव (वय 29, रा. लक्ष्मीनगर, पुसद) असे असून जखमी बहिणीचे नाव विशाखा राजू भालेराव (वय 26) असे आहे. दोघे दुचाकीने माहेरी जात असताना हा अपघात घडला.


अपघातात विशाखा भालेराव यांच्या डोक्याला, पायाला व कंबरेला गंभीर मार लागला असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button