Uncategorized

महागाव तालुक्यात ग्रामसेवकांकडून लाखो रुपयांच्या वसुलीतील गैरव्यवहाराचा आरोप; सर्व ग्रामपंचायतींचे ऑडिट करण्याची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी घरपट्टी, गाव नमुना आठ तसेच विविध योजनांच्या नावाखाली नागरिकांकडून लाखो रुपयांची वसुली करून ती शासन अथवा ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा न करता अपहार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आर्थिक ऑडिट करावे, अशी मागणी पेढे येथील रमेश राठोड यांनी केली आहे.
राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार, ग्रामीण भागातील अनेक ग्रामसेवकांनी गाव नमुना आठ, कर वसुली आणि घरकुल योजनेच्या विविध प्रक्रियांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली; मात्र ती अधिकृत खात्यात जमा करण्यात आली नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी किती कर वसूल केला आणि प्रत्यक्षात किती रक्कम शासन किंवा ग्रामपंचायत खात्यात जमा केली याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने मागवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“गावाच्या विकासासाठी वापरला जाणारा निधीच अपहारातून गायब होत असेल, तर हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. संबंधित ग्रामसेवकांच्या मालमत्ता व व्यवहारांची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी,” अशी मागणीही करण्यात आली आहे.
या आरोपांमुळे महागाव तालुक्यात ग्रामपंचायत कारभाराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button