Uncategorized

जबरदस्ती चोरीचा गुन्हा उघडकीस; पुसद ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ५ आरोपींसह एक विधीसंघर्ष बालक ताब्यात


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
काळी दौलत पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावत पाच आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी अरुण निवृत्ती पाईकराव (रा. साई विहारनगर, कवडिपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ एप्रिल रोजी रात्री सायंकाळी ते आपल्या मित्रासह शेतातून घरी परत येत असताना कवडिपूर शिवारात काही अज्ञात युवकांनी मोटारसायकल आडवी लावून त्यांना अडवले. आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत लाकडी काठीने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सुमारे ७.५ तोळे सोन्याच्या दोन चेन व तीन अंगठ्या जबरदस्तीने हिसकावून नेल्या. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे २ लाख २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत देवाशीष संतोष गुडपे, दुर्गेश राम भंडारी, आदित्य विजय जाधव, गौरव उर्फ चिंटू गावंडे, संतोष उर्फ काळे संजय जाधव यांना ताब्यात घेतले. तसेच एका विधीसंघर्ष बालकाचाही सहभाग निष्पन्न झाला.
आरोपींकडून चोरीस गेलेल्या दोन सोन्याच्या चेन, तीन अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल व कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button