Uncategorized
महागाव तालुक्यातील बोथा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दौलत गव्हाळे यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

.
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
या प्रकरणी पोफाळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून परमेश्वर मोरे आणि विनोद गव्हाळे यांना आरोपी करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



