शहर

शिवसेनेचा इशारा: २४ एप्रिलला उमरखेड तालुका बंदचा इशारा पेट्रोल पंप प्रकरणावर संताप

मुख्य संपादक

उमरखेड छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील पेट्रोल पंप प्रकरणावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत दि. २४ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण उमरखेड तालुका बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक, उमरखेड यांना अधिकृत निवेदन देण्यात आले असून प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी संबंधित पेट्रोल पंपाला मुदतवाढ दिल्याने स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित पेट्रोल पंपाबाबत यापूर्वीच ३०० हून अधिक तक्रारी दाखल झालेल्या असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता उलट मुदतवाढ दिल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पेट्रोल पंपामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला आहे. सदर पेट्रोल पंपावर
ग्राहकांसाठी स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही
लोकांच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून प्रशासनाचा एकतर्फी निर्णय देण्यात आल्याने
तालुका बंदची घोषणा करताना शिवसेनेने स्पष्ट केले आहे की,
दि. २४ एप्रिल रोजी संपूर्ण तालुक्यातील व्यापार-व्यवसाय बंद ठेवण्यात येणार
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार
त्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDO) उमरखेड यांना निवेदन देण्यात येणार तसेच या आंदोलनासाठी येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था, ध्वनीप्रक्षेपक (लाऊडस्पीकर) यासाठी पोलिस प्रशासनाने परवानगी देऊन सहकार्य करावे अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रवीण पाटील मिराशे तालुका प्रमुख,
ॲड. संजूकुमार जाधव शहर प्रमुख, कैलास कदम माजी उपजिल्हा प्रमुख,
श्रीमती सपना चौधरी महिला शहर प्रमुख,
विनायक पोहरकर युवासेना प्रमुख,
सुनील शहाणे विधानसभा समन्वयक,
रमेश चव्हाण जेष्ठ शिवसैनिक, बसवेश्वर शिरसागर उपशहर प्रमुख,संदीप कोकाटे प्र. शह संघटक यांच्या उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले आहे.
एकंदरीत, पेट्रोल पंप प्रकरणावरून उमरखेडमध्ये राजकीय वातावरण तापले असून, २४ एप्रिलचा बंद यशस्वी झाल्यास प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button