शहर
हिमायतनगरच्या वीज प्रश्नांवर खासदार आष्टीकर ॲक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

(हिमायतनगर तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम ):
हिमायतनगर शहर आणि तालुक्यातील महावितरणच्या बोजवारा उडालेल्या कारभाराबाबत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव विश्रामगृह येथे बैठक घेऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तालुक्यातील जनतेला सतावणारे वीज प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे सक्त निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काईतवाड, नगरसेवक तथा गटनेते विठ्ठल दादा ठाकरे, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जाफरखान लाला आणि सोहेल खान यांची प्रमुख उपस्थिती होती. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, यात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या बैठकीत देण्यात आला.



