उमरखेडमध्ये सैनिक शेतकरी वेल्फेअर फाऊंडेशन तालुका शाखेचा भव्य शुभारंभ

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड, ३ एप्रिल २०२६ — श्रीराम मंगल कार्यालयात आज सैनिक शेतकरी वेल्फेअर फाऊंडेशनच्या तालुका शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. संस्थापक अध्यक्ष मनोज कुमार डांगे सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला उपाध्यक्ष नीलेश निकम, सचिव संजय सतइ, यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, तालुका अध्यक्ष प्रविण म्हसारकर, महिला जिल्हाध्यक्ष सरला ताई इंगळे, जयश्री ताई पिसालकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डांगे सरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आतापर्यंत सैनिक-शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण्यांनी फक्त भांडवल केले. आमची संस्था ग्रामीण गरीब महिला, सैनिक आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कंबर कसली आहे.” त्यांनी संस्थेच्या विविध योजना आणि सामाजिक उपक्रमांची माहिती देताना विरोधकांच्या अपप्रचाराला विकासातून उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन चंदन सावते यांनी केले. आभार प्रदर्शन उमरखेड तालुकाध्यक्ष मनोज कुरतडे व महिला तालुकाध्यक्ष उज्ज्वला ताई सावते यांनी केले. उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट करत संस्थेला शुभेच्छा दिल्या.



