महागाव तालुक्यात जलजीवन मिशनची कामे अर्धवट; वडत येथे निकृष्ट टाकी पाडण्याचे आदेश उपशीर्षक:

उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईची भीती; पाईपलाईन व नाल्यांची कामेही अपूर्ण
महागाव प्रतिनिधी: संजय नागरगोजे
केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘घर-घर जल’ योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांची स्थिती महागाव तालुक्यात चिंताजनक बनली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू असली, तरी अनेक ठिकाणी ती अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
तालुक्यातील वडत येथे उभारण्यात आलेली पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असून ती झुकलेल्या अवस्थेत असल्याने धोकादायक स्थितीत आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच व संबंधित कनिष्ठ अभियंता (JE) यांनी जाधव ठेकेदार यांना सदर टाकी पाडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नव्याने उभारण्याचे लेखी आदेश दिले आहेत. टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे अशा मागणीला जोरदार आहेत
दरम्यान, तालुक्यातील इतर गावांमध्येही पाईपलाईन टाकण्याची कामे अर्धवट सोडण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. काही ठिकाणी पाईपलाईन टाकून नाल्यांची कामे करण्यात आली असली, तरी त्यांची खोली अपुरी असून अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. परिणामी, पाणीपुरवठा योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधी याकडे का लक्ष देत नाही आमदार खासदार यांनी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी कोणती ठोस भूमिका घेतली नसल्याचे चित्र महागाव तालुक्यात दिसून येत आहे बारभाई तांडा लेवा येथे अशीच परिस्थिती आहे तिथे सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे त्यामुळे
या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असतानाही कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांची हलगर्जीपणा यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
उन्हाळा जवळ येत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून निकृष्ट व अपूर्ण कामांची चौकशी करावी, तसेच सर्व कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.



