शहर

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डि जे वाजविण्यास परवानगी द्या, (तालुक्यातील भीम सैनिकांची एस डी पी ओ कार्यालयावर धडक)

सहसंपादक शेख मुजाहिद
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 14 एप्रिल रोजी डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी उमरखेड तालुक्यातील भीमसैनिकांच्या वतीने निवेदनाद्वारे उपविभागीय पोलिस अधिकारी उमरखेड यांना दिनांक 28 मार्च रोजी करण्यात आली,
गत वर्षापासून उमरखेड तालुक्यात डीजे वाजवण्यावर पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे, पारंपारिक वाद्य वाजवूनच सण उत्सव साजरी करण्यात यावे असे आव्हान सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते, परंतु उमरखेड तालुका वगळता यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात सण उत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणात डीजे वाजवण्यात येते तर मग उमरखेड तालुक्यातच डीजे वाजवण्यास बंदी घालण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले, भीम जयंती उत्सव देशभरासह उमरखेड तालुक्यातील गावागावात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येऊन शोभायात्रा काढण्यात येणार आहे, पारंपारिक वाद्याद्वारे प्रत्येक ठिकाणी शोभायात्रा व मिरवणूक शक्य नाही पारंपरिक वाद्यांचा मोठा आर्थिक भुर्दंड सुद्धा न पडणारा आहे, तसेच इतर ठिकाणी डीजे वाजविण्यावर कुठलीच बंदी नसल्याने उमरखेड तालुक्यातील आंबेडकरी अनुरायांच्या भावना लक्षात घेता येत्या भीम जयंती म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डीजे वाजविण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी उमरखेड तालुक्यातील ढाणकी विडुळ उमरखेड बाळदी बेलखेड महागाव सावळेश्वर बिटरगाव गांजेगाव मन्याळी चिंचोली, पिरंजी,व इतर खेड्यापाड्यातील भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आली यावेळी आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे , दादू धुळे, राम गायकवाड रुपेश गायकवाड शुभम नरवाडे साई पडोळे राहुल वाठोरे सुनील वाठोरे मयूर गायकवाड गोलू भवरे रोहन सावतकर यश गायकवाड गोलू गायकवाड सम्राट मुनेश्वर रोहित कवडे
नरेंद्र धुळे ,राहुल मुनेश्वर बुद्धभूषण धुळे किरण नरवाडे चंदू भगत सुमित धुळे
सुमेध काळबांडे
इंद्रजित पाईकराव बलराज कदम तथागत पाईकराव
अक्षय पाईकराव तुषार कांबळे शिवतात्न चौरे अजय ढोले
प्रफुल हपसे नारायण राऊत संगम हपसे
सोनू मुनेश्वर सुनील धुळे रवी काळबांडे
सुहास मुनेश्वर सुरज नरवाडे सचिन मुनेश्वर
पंजाक धोगडे
संकेत बारकोडे रोहित कांबळे
रवी झिंझाडे शेकडो भीमसैनिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button