शहर

यवतमाळ जिल्ह्यात पांदण रस्ते व इंधन अफवांवर नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण बैठक


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्ह्यातील पांदण रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच गॅस सिलेंडर, डिझेल व पेट्रोल संदर्भातील अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ व्हावे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी पांदण रस्त्यांची कामे जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, गॅस सिलेंडर, डिझेल व पेट्रोल संदर्भातील अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस पालकमंत्री संजयजी राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके, आमदार किसनरावजी वानखेडे, आमदार राजू तोडसाम, आमदार बाळासाहेब मंगुळकर, आमदार संजय देसकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पटकी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button