शहर

हिमायत नगर ईदगाहात नमाज शांततेत संपन्न; पोलीस प्रशासन, हिंदू पदाधिकारी आणि पत्रकारांकडून गुलाबाच्या फुलांसह ईदच्या शुभेच्छा!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
शहरातील ईदगाह मैदानावर आज ईद-उल-फितरची नमाज अत्यंत सुकून आणि शांततेत पार पडली. हिमायत नगरच्या ज्या हिंदू-मुस्लिम एकतेची चर्चा जिल्ह्याबाहेर आणि इतर तालुक्यांत अभिमानाने केली जाते, ती एकता आज प्रत्यक्ष कृतीतून खरी ठरली आहे.
​प्रशासनाचा आणि पत्रकारांचा पुढाकार:
नमाज संपल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. अमोल भगत आणि त्यांचे सर्व कर्मचारी, तसेच शहरातील हिंदू समाजाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून मुस्लीम बांधवांचे स्वागत केले. पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक नमाजीला गुलाब पुष्प देऊन ‘ईद मुबारक’ म्हणत आपुलकीने मिठी मारण्यात आली. पोलीस आणि जनतेमधील हा स्नेह पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
​गोडव्याने जिंकली मने:
यावेळी हिंदू बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष स्टॉल्स लावून सोनपापडी, खारे आणि गोड पदार्थांचे वाटप केले. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक मुस्लीम बांधवाचे तोंड गोड करून सर्वांनी गळाभेट घेतली. प्रशासन, पत्रकार आणि सर्वच स्तरातील नागरिकांनी दाखवलेला हा एकोपा संपूर्ण जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरला असून, हिमायत नगरची गंगा-जमुनी तहजीब आज पुन्हा एकदा झळाळून उठली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button