शहर

उमरखेड पंचायत समितीतील ग्रामसेवकावर गंभीर आरोप; एटीएस चौकशीची मागणी (भाग 1)


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या एका ग्रामसेवकावर गंभीर आर्थिक गैरप्रकारांचे आरोप समोर आले असून, या प्रकरणाची विशेष पथक (ATS) मार्फत सखोल चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित ग्रामसेवकाने आपल्या कार्यकाळात हरडडा (2018 ते 2023), धानोरा (सा) (2014 ते 2015) तसेच वाकडी (2022 ते 2025) या ग्रामपंचायतींमध्ये काम करताना विकासकामांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे. निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून स्वतःच ठेकेदारी केल्यामुळे अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, त्यातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, गावातील विविध विकासकामांमध्ये पारदर्शकता न ठेवता नियमबाह्य पद्धतीने कामे केली गेली. यामुळे ग्रामविकासावर परिणाम झाला असून नागरिकांना पुन्हा त्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामसेवक व त्यांच्यासोबतच्या सरपंचांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तसेच, संबंधित ग्रामसेवक व त्यांच्या कुटुंबीयांच्या चल-अचल मालमत्तेची चौकशी करून अवैध संपत्ती जप्त करावी, अशीही मागणी अर्जात करण्यात आली आहे. यासाठी सात दिवसांत कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासन आता याकडे काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button