Uncategorized

डेफ्कन डिस्टिलरीचे स्पेंट वॉश ‘पुस’ प्रकल्पाच्या कालव्यात; पर्यावरणाला गंभीर धोका उपमथळा: इंधन बचतीसाठी टँकर चालकांची चलाखी; विषारी पाण्यामुळे शेतकऱ्यांत संताप


महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सवना ते गुंज परिसरात डेफ्कन डिस्टिलरी प्रकल्पातून निघणारा विषारी ‘स्पेंट वॉश’ थेट पुस प्रकल्पाच्या कालव्यात सोडला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. इथेनॉल निर्मिती प्रक्रियेदरम्यान तयार होणारे हे रासायनिक पाणी टँकरद्वारे वाहून नेण्याऐवजी चालकांकडून इंधनाची बचत करण्यासाठी शॉर्टकट घेत कालव्यांमध्येच टाकले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे कालव्याच्या पाण्याचे प्रदूषण वाढले असून शेतातील पिके, जनावरे आणि जलस्रोत धोक्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचा रंग काळवंडला असून दुर्गंधी पसरली आहे. या विषारी पाण्यामुळे जनावर मृत्यू पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक शेतकरी संतप्त झाले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, या प्रकाराबाबत पूर्वीही तक्रारी देण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याने हा प्रकार वारंवार घडत आहे. काही ठिकाणी स्पेंट वॉश साठवण्यासाठी व्यवस्था असतानाही टँकर चालकांकडून नियमबाह्य पद्धतीने ते फेकले जात असल्याचे आरोप आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पाण्याचे स्रोत वाचवण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी लिखित तक्रार पर्यावरण विभाग व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button