मूल्यवर्धन एक मूल्यधारित शिक्षण

मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून मानसशास्त्राची ओळख आहे पण खरे पाहता मूल्यशिक्षणातून या वर्तनाची जडणघडण होते.
मुले ही आई वडील, समाज ,मित्र व इतरांकडून कळत- नकळत प्रेरणा व शिक्षण घेतात; पारंपरिक समाजामध्ये यावर जास्त भर होता . सध्याच्या वर्गवारीच्या जीवनामध्ये विभक्त कुटुंब पद्धती व औपचारिक शिक्षणावर जास्त भर आहे यातच अतिउच्च विषमता यामुळे समाज जीवनावर गंभीर परिणाम होताना दिसत आहेत. हल्लीच्या वर्तमान पत्रात आलेल्या काही बातम्या मला आठवतात अल्पवयीन मुलाने आई वडील यांचा खून करणे, चोरी करणे , आपल्याच रक्षणासाठी असलेल्या पोलिस ,सैनिकावर दगडफेक करणे, AI च्या माध्यमातून बदनामी कारक फोटो तयार करून समाज माध्यमावर शेअर करणे असे असंख्य उदाहरणे आपण बघतो.
अवाढव्य लोकसंख्या असलेल्या देशात असे होणारच; असे नाही, आजच्या तयार होणाऱ्या पिढ्या उद्याचे भविष्य आहे आणि याच पिढ्या घडवण्याचे काम मूल्यवर्धन शिक्षणातून शांतीलाल मुथा फाउंडेशन व महाराष्ट्र सरकार च्या माध्यमातून होत आहे.
राज्यघटना अस्तित्वात आल्यापासून त्यातील मूल्याचा प्रभाव सर्वसामान्यांवर आहे हीच मूल्ये स्वतंत्र, समता, बंधुता प्रत्यक्षपणे शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनून पुस्तक रूपाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी मूल्ये अंगी उतरवीत आहेत .
आजच्या धकाधकीच्या आणि तांत्रिक युगात केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे पुरेसे नाही. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ पदवी मिळवणे नसून एक चांगला माणूस घडवणे हा आहे. याच उद्देशाला समोर ठेवून ‘मूल्यवर्धन’ हा उपक्रम महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाची क्रांती ठरत आहे.
मूल्यवर्धन म्हणजे काय?
‘मूल्यवर्धन’ हा शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे. हे केवळ एक विषयाचे अध्यापन नसून, विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणारी एक जीवनपद्धती आहे. यात भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवले गेले आहे.
पारंपारिक शिक्षण पद्धतीत अनेकदा पाठांतरावर भर दिला जातो. परंतु, मूल्यवर्धन कार्यक्रमात ‘कृतीतून शिक्षण’ (Learning by doing) दिले जाते. वर्गात शिक्षक व्याख्यान देण्याऐवजी विद्यार्थ्यांना गटचर्चा, खेळ, कथा आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता विकसित होते.
विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य मिळते आणि इतरांच्या मतांचा आदर करायला ते शिकतात.
स्वतःच्या कर्तव्याची आणि हक्कांची जाणीव या उपक्रमातून होते.
छोट्या-छोट्या कृतींमधून योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून घेण्याची शक्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. सहानुभूती, सहकार्य आणि प्रेम या भावनांची रुजवणूक झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध होत.
शिक्षण हे केवळ मेंदूचा विकास करणारे नसावे, तर ते हृदयाला स्पर्श करणारे असावे. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे शाळांमधील वातावरण अधिक आनंददायी आणि मैत्रीपूर्ण झाले आहे. जर आपल्याला भविष्यात एक भ्रष्टाचारमुक्त, न्यायप्रिय आणि प्रगत समाज हवा असेल, तर प्राथमिक स्तरापासूनच अशी मूल्यधारित शिक्षण पद्धती राबवणे ही काळाची गरज आहे.
हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने ‘माणूस घडवण्याची शाळा’ आहे.
तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून एक सिद्धांत मांडणी मांडला तो असा की ,
‘बीज तैसे फळ’ ‘शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी’ द्राक्षाचिया वेल कडुलिंबावर चढीला कडू कैसा झाला तुका म्हणे’
वरील अभंगातून ही लक्षात येते की बीज शुद्ध असून चालत नाही तर त्यावर झालेले संस्कारिक वर्तन महत्वाचे असते आणि ह्याच वर्तनात बदल करण्याचे काम मूल्यवर्धन शिक्षणातून वर्ग 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांना होत आहे.
दिपक मोरे
पदवीधर शिक्षक
BED, MED, M.A ECO.
more. dipak12@gmail. Com
जि.प उच्च प्राथमिक शाळा शिळोणा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ



