आर्णी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत

आर्णी : येथील शासकीय विश्रामगृहात १५ ऑगस्ट रोजी आर्णी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी आबिद फानन, उपाध्यक्षपदी मनोज माघाडे, सचिवपदी जाकीर सोलंकी, कार्याध्यक्षपदी गणेश एकंडवार, तर कोषाध्यक्षपदी परवेज बेग मिर्झा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नासह सामाजिक व जनहिताच्या विषयांना प्रभावीपणे वाचा निर्धार यावेळी करण्यात आला.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीनंतर सामाजिक कार्यकर्ते तथा अंजली ड्रेसेसचे संचालक राजेश श्रीवास यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी अध्यक्ष आबिद फानन, उपाध्यक्ष मनोज माघाडे, सचिव जाकीर सोलंकी, कार्याध्यक्ष गणेश एकंडवार, कोषाध्यक्ष परवेज बेग मिर्झा यांच्यासह पत्रकार रंजना ताई आडे, पूजा ढाले, बबिता शिवणकर, जफर पठाण, गणेश धनोडे, किशोर पवार, सनी आडे, पुनीत मजेठीया, चंदन राठोड, राजू राठोड, फयाज पठाण, राहुल वानखडे व पूजा शिंदे उपस्थित होते.



