शहर
हिमायतनगर: वॉर्ड क्र. ०३ मधील पाणीटंचाईप्रश्नी प्रशासकीय दिरंगाई; नागरिकांनी निवेदनाद्वारे वेधले लक्ष

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम ):
येथील नगर पंचायत प्रशासनाच्या संथ कारभारावर बोट ठेवत, वॉर्ड क्रमांक ०३ मधील भीषण पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आज मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. गेल्या दोन महिन्यांपासून सार्वजनिक बोअर बंद असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.
ठळक मुद्दे:
वॉर्ड क्र. ०३ मध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
बोअर बंद असल्याने महिलांना लांबून पाणी आणावे लागत असून तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर शेख मुजीन शेख मौला, शेख रफिक शमशोद्दीन, शेख वसीम व वॉर्डातील इतर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



