आरोग्यशहर

उमरखेड शासकीय रुग्णालयातील डायलिसिस सेंटर मध्ये सुविधांचा अभाव

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड शहरातील राजाराम प्रभाकर उत्तरवार शासकीय रुग्णालयात नुकत्याच पाच महिन्यांपूर्वी उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णाची डायलिसिस साठी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी सुसज्ज असे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु डायलेसिस रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकासाठी बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साधारणतः एका रुग्णाला डायलिसिस पूर्ण होण्यासाठी तीन ते चार तासाचा कालावधी लागतो. रुग्णांना अनेक तास वाट पाहावी लागते. तर नातेवाईकांना बाहेर उभे राहून प्रतीक्षा करावी लागते.

चौकट
नातेवाईकाच्या समस्या

डायलिसिस सेंटर मध्ये, वेटिंग रूम मध्ये बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था नसल्यामुळे नातेवाईकांना बाहेरच उभे राहावे लागते.
या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही.
डायलेसिस सेंटर कडे येणाऱ्या रस्त्यावरच पाणी साचलेले असते.

ंपरिणाम..
रुग्ण आणि नातेवाईक विशेषता वृद्धांना तासन तास उभे राहावे लागते. त्यामुळे ते थकतात.
परिस्थिती
काही रुग्णांना डायलिसिस दरम्यान चक्कर येणे किंवा उलट्या होणे संभाव्य दुष्परिणाम सारखे प्रकार घडल्यास नातेवाईकांना त्वरित बोलावणे कठीण होते.
डायलिसिस केंद्रात पुरेशी बसण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी रुग्णालयाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकाकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button