शहर

“तालुका स्तरीय भजन स्पर्धेत संस्कार पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगीरीसंस्कार नावाप्रमाणेच संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याची शाळेची तळमळ

एस पी दळवी
उमरखेड
दि .५ नोव्हेंबर २०२५

उमरखेड येथील प्रसिद्ध असलेले दाजी विठ्ठल पंत भक्ती तीर्थ
‘श्री आईनाथ महाराज संस्थान ‘तीन देऊळ उमरखेड आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धा दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाली . या स्पर्धेत २० मंडळांनी सहभाग नोंदविला होता . त्यामध्ये संस्कार पोदार लर्न स्कूल उमरखेड शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित ‘तिसऱ्या क्रमांकाचे ‘बक्षीस मिळविले . त्यामध्ये कु .स्वरांजली परमानंद जाधव या विद्यार्थिनीने संत तुकारामाचे अभंग गायले तर कु.अनुष्का दत्तराव वाघमारे या विद्यार्थिनीने संत तुकडोजी महाराज यांचे पद गायन केले , तसेच कु .विधी वैभव कोडगिरवार हिने संत जनार्दन महाराजांची गवळण गाऊन सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले . पोदार स्कूल विज्ञान युगात इंग्रजी बरोबर ‘भारतीय संस्कृती (अध्यात्म ) जोपासण्यातही अव्वल ‘ आहे हे पुन्हा दाखवून दिले .
यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय संचालक राजेश देशमुख , अजय क्षीरसागर, नितीन बयास, धीरज बगाडे,प्रिन्सिपल डॉ. भैरोबा मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार,संगीत शिक्षक परमानंद जाधव व शिक्षिका शारदा जाधव यांना देतात .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button