Uncategorized

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत श्री तेजमल गांधी विद्यालयाची दणदणीत कामगिरी

  • इयत्ता ८ वीच्या निकालात ५३ विद्यार्थी यशस्वी

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणाऱ्या इयत्ता ८ वीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात ब्राम्हणगाव येथील श्री तेजमल गांधी विद्यालय व कृषी विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल ५३ विद्यार्थी उत्तीर्ण होत शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
विद्यालयात संयुक्त प्रथम क्रमांक
श्रद्धा गजानन कोंडरवाड – १३४ गुण
रितिका चंद्रमणी सावते – १३४ गुण
द्वितीय क्रमांक
अक्षरा गजानन राजेवाड – १२९ गुण
तृतीय क्रमांक
विशाल विठ्ठल कऱ्हाळे – १२७ गुण
तसेच प्रथमेश दत्ता मार्लेवाड (१२१), ओमकार सुरेश ढोले (१२०), सुरज प्रकाश काळे (११८), वेदिका देवानंद हातमोडे (११८), सोहम राजेश्वर मुदगुलकर (११५), तनवी गजानन माने (११४), नागोराव दत्ता माने (११४), अनुष्का माधव सादलवाड (११३), गौरी गणेश गौरवाड (११२) यांसह इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय गुण मिळवून विद्यालयाचा गौरव वाढवला.
ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामग्रीत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. श्री विजयराव पाटील चोंढीकर, अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध पाटील चोंढीकर (श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसद), सचिव सौ. आश्विनिताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर, अध्यक्ष डॉ. विजयराव माने (श्री तेजमल गांधी विद्यालय, ब्राम्हणगाव), अॅड. सौ. अर्चनाताई माने तसेच मुख्याध्यापक श्री विष्णू सादुडे, पर्यवेक्षक श्री खोकले, समन्वयक गावंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे ब्राम्हणगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विद्यालयाने पुन्हा एकदा गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button