शहर

२४ वर्षांची सामाजिक बांधिलकी! वैश्विक विकास संस्थेकडून गुळ कारखाना कामगारांना कपडे वाटप

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली तब्बल २४ वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या वैश्विक विकास संस्था मुळावा यांच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने गुळ कारखान्यात (गुऱ्हाळावर) काम करणाऱ्या कामगारांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.
संस्थेने आपल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत समाजाभिमुख कार्यक्रमांची मालिकाच राबवली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील सामान्य ज्ञान स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी उसापासून गूळ तयार करणाऱ्या गुऱ्हाळावरील कामगारांच्या श्रमांचा सन्मान करत त्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कामगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास तरोडा केंद्राचे केंद्रप्रमुख आनंदराव देशमुख, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल शेंबाळपिंपरीचे संचालक विजयराव वाकडे, आनंदराव सूर्यवंशी, जिल्हा परिषद शाळा विडुळचे शरद थोरकर, संस्थेचे अध्यक्ष अजय झरकर तसेच प्राचार्य दीपा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम वाकडे यांनी केले. संचालन अनुजा देशमुख व चैत्राली गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन पूनम गंगाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
समाजाशी नाळ जपणारी २४ वर्षांची वाटचाल — वैश्विक विकास संस्थेचा उपक्रम पुन्हा एकदा ठरला कौतुकास्पद!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button