शहर

नगर पंचायतीच्या नाकाखाली हैदोस; २० जण जखमी, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे फेरोज खान आक्रमक!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून प्रभाग क्र. १, २, ५ आणि इस्लामपुरा परिसरात २० हून अधिक नागरिक रक्ताळले आहेत. निष्पाप बालकांचे लचके तोडले जात असतानाही नगर पंचायत प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. “जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या या ढिसाळ कारभाराला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
​कलम १८ चा विसर अन् आरोग्याचा बोजवारा
​महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमाच्या कलम १८ नुसार, शहरातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा राखणे ही नगर पंचायतीची कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, शहरात कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही यंत्रणा राबवली जात नाही. त्यातच उपजिल्हा रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक इंजेक्शनचा (ARV) पत्ता नसल्याने, जखमी गरिबांना उपचारासाठी नांदेडला धाव घ्यावी लागत आहे. प्रशासनाच्या या नाकर्तेपणामुळे सामान्य जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
​”नगर पंचायत फक्त टॅक्स वसुलीत मग्न आहे का? जर तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही आणि रुग्णालयात औषधे उपलब्ध झाली नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.”
— फेरोज खान (जिल्हा उपाध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, नांदेड)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button