शहर

हिमायतनगर शहरात अनेक तास वीजपुरवठा खंडित, नागरिक त्रस्त


/हिमायतनगर तालुका प्रतिनिधि शेख खयुम/

हिमायतनगर शहरातील काही भागांमध्ये अनेक तासांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात वारंवार लाईट बंद होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रमजान, दिवाळी, दसरा, गणपती उत्सव, शिवजयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महाशिवरात्री अशा विविध सणांच्या काळातही वीजपुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही फोन उचलला जात नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. काही वेळा फोन उचलला तरी “काम सुरू आहे”, “लाईनमन बाहेर गेले आहेत”, अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोप आहे.
दरवर्षी डीपी आणि वायरिंगची दुरुस्ती करून भविष्यात त्रास होणार नाही असे आश्वासन दिले जाते, मात्र परिस्थितीत कोणताही ठोस बदल दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या सततच्या समस्येबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संपादक शेख मुजम्मिल यांच्या वतीने प्रतीकात्मक सत्कार करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांना लवकरात लवकर सुरळीत वीजपुरवठा सुरू करण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button