शहर

महागावात शिवजन्मोत्सवाची धूम शिवछत्रपतींच्या जयघोषाने नगरी दुमदुमली; भव्य शोभायात्रा नेत्रदीपक


महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे
महागाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “शिवछत्रपतींचा जयजयकार”च्या घोषणांनी महागाव नगरी दुमदुमून गेली.
आज सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा उपस्थित होते.
माजी उपाध्यक्ष उदय नरवाडे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तसेच रामराव पाटील, सुरेश पाटील, महिंद्रा कावळे, नारायण शिरबीडे, गजानन साबळे, दीपक आडे, बाळासाहेब पाटील नरवाडे, जयंत चौधरी, प्रकाश नरवाडे, गजानन नेवारे, शंकर नरवाडे, नितीन वानखडे, संजय नरवाडे, निलेश पाटील नरवाडे यांच्यासह अनेक शिवभक्तांनी अभिवादन केले.
भव्य शोभायात्रा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रा सायंकाळी वाजत-गाजत काढण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या मिरवणुकीत शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गावकरी मंडळी, पदाधिकारी आणि शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शिस्तबद्ध नियोजन, उत्साहपूर्ण सहभाग आणि शिवभक्तीच्या वातावरणात महागावातील शिवजन्मोत्सव संस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button