शहर

निरोप समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांसह शिक्षकही गहिवरले


एसपीएलएस मधील१० व्या वर्गाच्या पहिल्या तुकडी (बॅच) च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

एस पी दळवी
ता. प्र. उमरखेड
स्थानिक(एसपीएलएस) पोदार लर्न स्कूल मधील वर्ग दहावीच्या पहिल्या तुकडी(बॅच) च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ(Farewell Ceremony) दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आनंद उत्साह आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
संचालक मंडळातील अजय क्षीरसागर यांचे अध्यक्षतेत शाळेचे प्रिन्सिपल भैरोबा मुंजाळ, व्यवस्थापक अतिश दिघेवार यांचे प्रमुख उपस्थितीत प्रणवी कदम जान्हवी तडोले यांच्या प्रार्थना व स्वागतगीताने वैष्णवी तंत्रे हिचे स्वागतपर भाषणाने निरोप समारंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांसह समन्वयक निखिल तुकदेव, प्रसाद कांबळे, दिनकर कदम यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना आगामी परीक्षेला समोर कसे जायचे इत्यादी बाबतीत प्रेरणादायी संदेश देत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी प्रतिनिधी स्वरूपात वर्ग दहावीतील विद्यार्थी देवेंद्र बोनगिलवार व गौरी रायेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सदर शाळेची वर्ग दहावीची ही आमची पहिली तुकडी (बॅच) असून या पहिल्या तुकडी(बॅच)चे आम्ही विद्यार्थी असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो शाळेत मिळालेली शिस्त आम्हाला भविष्यात पदोपदी उपयोगी पडणार असल्याचे प्रतिपादन केले यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध गीत,नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले याप्रसंगी दहावी वर्गातील परीक्षेला सामोरे जात असणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाकडून भेटवस्तू देण्यात आल्या. अनन्या देशमुख हिचे समारोप संदेशाने व रोहिणी राठोड हिचे आभार प्रदर्शनाने समस्त वातावरण भावनामय झाले होते. अंजू मॅडम यांचे मार्गदर्शनात शाळेतील वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या निरोप समारंभाचे आयोजन वर्ग नववीतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने केले केले हे विशेष. सदर कार्यक्रमाप्रसंगी समस्त शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. संचालक मंडळातर्फे परीक्षार्थींना त्यांच्या पुढील शैक्षणिक उज्वल भविष्याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुद्धा अंतकरणातून गहिवरून आल्याचे स्पष्ट दिसू लागले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button