शहर

भगवती सुपर स्पेशालिटी व कॅन्सर हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन — ग्रामीण आरोग्यसेवेचा नवा टप्पा

महागाव प्रतिनिधी – संजय नागरगोजे

उमरखेड तालुक्याचे भूमिपुत्र डॉ. अंकुश देवसरकर आणि डॉ. शुभांगी देवसरकर यांच्या “भगवती सुपर स्पेशालिटी आणि कॅन्सर हॉस्पिटल” या आरोग्यसेवेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन नांदेड येथील जुना कौठा येथे भव्य सोहळ्यात पार पडले.

या प्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. माजी मंत्री डॉ. डी.पी. सावंत, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागात आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देवसरकर दांपत्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. नव्या इमारतीत अत्याधुनिक कॅन्सर उपचार, आधुनिक निदान सुविधा आणि कुशल तज्ञ डॉक्टरांच्या सेवांचा लाभ रुग्णांना मिळणार आहे.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या कार्याचे कौतुक करत म्हटले, “ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत.”

हा उपक्रम फक्त हॉस्पिटल बांधण्यापुरता मर्यादित नसून, ग्रामीण जनतेसाठी आरोग्याच्या नव्या युगाची सुरूवात आहे.

डॉ. अंकुश व डॉ. शुभांगी देवसरकर यांच्या या सामाजिक उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा!

—

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button