शहर

पत्रकार राजेश ढोले धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित!

[ 34 वी धम्मपरिषद वटफळी तालुका नेर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला सन्मान सोहळा संपन्न.]

सहसंपादक शेख मुजाहिद
रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचे विदर्भ उपसंपादक,तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र पुसद तालुका प्रतिनिधी तसेच सामाजिक सांस्कृतिक,अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे पुसद तालुक्यातील लक्ष्मी नगर बोरगडी निवांसी उपा. राजेश मोतीराम ढोले सपत्नीक सहकुटुंब यांना महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी यांच्या वतीने धम्मभूषण पुरस्कार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी 34 व्या धम्म परिषद वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सन्मान सोहळा संपन्न झाला.

या धम्मपरिषदेला
विविध मान्यवर, देश विदेशातील भिक्खू संघ सामाजिक न्याय विभाग तथा महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी यांचे प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष भदंत डॉ. नागघोष महाथेरो, उपाध्यक्ष भदंत डॉ. हर्षबोधी महाथेरो, पीएचडी पाली तथा बुद्धिझम व इतिहास एम फिल, संस्थेचे सचिव डॉ. एच आर धम्मदीप महाथेरो, अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक महू मध्यप्रदेश इत्यादींच्या अध्यक्षतेखाली सन्मानपत्र व ट्रॉफी व देऊन सत्कार करण्यात आला.

34 व्या धम्म परिषदेचा आपल्या समाज बांधवास धम्मभूषण पुरस्कार मिळाल्याने पुसद तालुक्यातील समाजबांधव तथा इष्टमित्र परिवार तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळी सदर पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button