शहर

महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात हिमायत नगरमध्ये ‘अर्धनग्न’ आंदोलन; वामन पाटील मिराशे आक्रमक


​हिमायत नगर (ता प्रतिनिधी शेख खयूम खुरेशी ):
महावितरण विभागाच्या वाढत्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामन पाटील मिराशे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय शेतात जबरदस्तीने डीपी (रोहित्र) बसवणे आणि भरमसाठ वीज बिले पाठवून लूट करणे, याच्या निषेधार्थ आज हिमायत नगरमध्ये ‘अर्धनग्न आंदोलन’ करण्यात आले.
​यावेळी बोलताना मिराशे म्हणाले की, “महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. विनापरवाना कामे करणे आणि चुकीची वीज बिले देऊन वसुलीचा तगादा लावणे आता सहन केले जाणार नाही.” या आंदोलनामुळे वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
​प्रमुख मागण्या:


​शेतकऱ्यांच्या शेतातील अनधिकृत डीपी हटवाव्यात.
​चुकीची आणि वाढीव वीज बिले तात्काळ दुरुस्त करावीत.
​दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी.
​प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास संपूर्ण तालुक्यात ‘चक्का जाम’ करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button