शहर

वाळकेवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आमदार बाबुराव कदम कोहळीकर


​हिमायतनगर ( ता़ शेख खयुम खूरेशी प्रतिनिधी):
हिमायतनगर तालुक्यातील दुधड वाळकेवाडी येथे श्री गुरु समर्थ रामबाबू मेटकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रा महोत्सवात ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘शंकरपट’ स्पर्धेचे उद्घाटन हदगाव-हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ग्रामस्थांना संबोधित करताना त्यांनी “वाळकेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,” असे ग्वाही दिली.
​विदर्भासह नांदेड जिल्ह्याची ओळख असलेल्या या बैलगाडा शर्यतीत शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी झाडे साहेब, प्रताप पाटील देशमुख, विकास पाटील देवसरकर, उपसरपंच संजय माझळकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button