Uncategorized

उमरखेड तालुक्यात अजित दादा पवार यांना अश्रूंनी श्रद्धांजली; पोफाळीत शोकाकुल वातावरण

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व, जनतेच्या मनात घर केलेले व्यक्तिमत्त्व अजित दादा पवार यांचा दिनांक २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. दादांच्या अचानक जाण्याने सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये तीव्र शोकभावना व्यक्त होत असून, ठिकठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर उमरखेड तालुक्यातील वसंत साखर कारखाना, पोफाळी येथे दिनांक २९ जानेवारी रोजी पोफाळी परिसरातील नागरिकांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. पेन्शलवार यांच्या दवाखान्यासमोर दादांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात दादांबद्दल अपार प्रेम व आदरभावना स्पष्टपणे दिसून येत होत्या.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश शेंबडे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, गोपीचंद दोडके, डॉ. सतिश पेन्शलवार, माऊली मांगळूकर, डॉ. गणेश राठोड, सूर्यकांत सराने, अरविंद राठोड, सतिश कनवाळे, सदा पाटील, उत्तम टेलर, मजनू भाई, धनु दुकानदार, गजानन पुरी, गजानन हुपाडे, पंकज राठोड, ऋषिकेश लोखंडे, पत्रकार भागवत काळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
“अजित दादा पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व होते,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. श्रद्धांजली कार्यक्रमामुळे पोफाळी परिसरात शोकाकुल आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button