Uncategorized

हिवरा बायपास नसल्याने अपघातांची मालिका; एकाचा जागीच मृत्यू, अंबोडा येथे महिलांना किरकोळ दुखापत


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
हिवरा येथे बायपास मार्ग अद्याप पूर्ण न झाल्याने दर महिन्याला अपघात होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास नांदेडहून नागपूरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव किसन कुमार भागवत (रा. बेलथर, जि. हिंगोली) असे असल्याचे समजते. तो एम.एच. ३८ ए.एच. ३७४८ क्रमांकाच्या दुचाकीवर प्रवास करीत होता. अपघातात सहभागी ट्रकचा क्रमांक एम.एच. ०९ ई.एल. ४३९२ असा आहे.
दरम्यान, नागपूर–बोरी–तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील हिवरा बायपास अद्याप न झाल्याने या मार्गावर वारंवार मोठे अपघात घडत आहेत. मात्र, उंबरखेड ते यवतमाळ या दरम्यान दोन टोल नाके उभारून वाहनधारकांकडून वसुली सुरू आहे. त्यामुळे बायपास मार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी हिवरा येथील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
याच दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंबोडा येथे महिला कामगारांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला मागून येणाऱ्या टुरिस्ट ट्रॅव्हल वाहनाने धडक दिली. या अपघातात १२ महिला कामगार किरकोळ जखमी झाल्या असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button